OMG 2 कसा असणार आहे अक्षय कुमारचा नवीन चित्रपट OMG 2

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या ओह माय गॉड 2 या चित्रपटाने बरीच चर्चा केली आहे.11 जुलै रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच अक्षय कुमारच्या ओह माय गॉड या चित्रपटाचा टीझर इंटरनेटवर ट्रेंड करू लागला आहे. हे बागितल्या नंतर सोशल मीडियावर लोक खूप प्रतिक्रिया देत आहेत. चला तर मग, ओ माय गॉड २ (OMG 2)चा टीझर पाहिल्यानंतर लोक काय म्हणत आहेत ते आम्ही तुम्हाला या रिपोर्टमध्ये सांगणार आहोत.

OMG 2

ओ माय गॉड 2 चा टीझर लोकांना खूप आवडला

अक्षय कुमारने त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट अपडेट करताना ओह माय गॉड 2 चा टीझर शेअर केला आहे.  यासोबत खिलाडी कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले, विश्वास ठेवा.  सुरुवातीला पंकज त्रिपाठी म्हणतात की“ देव अस्तित्वात आहे की नाही, एखादी व्यक्ती आस्तिक किंवा नास्तिक असल्याचा पुरावा देऊ शकते, परंतु देव त्याने निर्माण केलेल्या लोकांमध्ये कधीही भेद करत नाही”.  यानंतर अक्षय कुमार भगवान शिवाच्या अवतारात प्रवेश करतो.  अक्षय कुमारचा हा लूक सगळ्यांनाच आवडला आहे.  लोक त्याचे जोरदार कौतुक करत आहेत.  एका यूजरने लिहिले की ,हा टीझर छान आहे पण काही लोकांना यात दोषही सापडतील.  दुसऱ्या युजर ने लिहिले की, टीझरच्या प्रत्येक सीनमध्ये सकारात्मकता दिसते

हे स्टार्स ओ माय गॉड २  (OMG 2)मध्ये दिसणार आहेत

यामी गौतम, पंकज त्रिपाठी आणि अरुण गोविल सुपरस्टार अक्षय कुमारच्या ओह माय गॉड 2 चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

OMG 2 रिलीज डेट
हा सिनेमा 11 ऑगस्टला रिलीज होतोय.  अक्षय कुमारचा OMG हा चित्रपट 2012 साली आला होता, जो लोकांना खूप आवडला होता.  आता ओह माय गॉड 2 ला चाहते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.  याआधी अक्षय कुमार बच्चन पांडे, राम सेतू, सेल्फी आणि अतरंगी या चित्रपटांमध्ये दिसले  होते . आता चाहते ओ माय गॉड २ ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अक्षय कुमारला केले ट्रोल

OMG 2 Teaser Akshay kumar Troll: अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘OMG 2’ या चित्रपटाच्या टीझरची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे. चित्रपटाच्या टीझरनंतर अक्षय कुमार सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे

. या चित्रपटाच्या टीझरची सोशल मीडियावर खूप जोरदार चर्चा सुरू आहे. ‘OMG 2’ च्या टीझरचे चाहते प्रचंड कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे, काही लोकांना चित्रपटाच्या टीझरमध्ये अशी त्रुटी आढळली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू आहे. चला मग जाणून घेऊया या टीझरच्या कोणत्या सीनवर वाद होत आहे.

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या ‘OMG 2’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझर रिलीज होताच वाद निर्माण झाला आहे.

या वादाचे कारण ‘OMG 2’ चित्रपटाच्या टीझरमध्ये अक्षय कुमारने असे काही केले आहे की, ते पाहून लोक संतापले आहेत. ‘OMG 2’ च्या टीझरमध्ये अक्षय कुमार गंगेत तोंडातील पाणी काढत असल्याचे दृश्य आहे.जे पाहून लोकांना आपला राग आवरता आलेला नाही आणि ट्विटरवर अक्षय कुमारला ट्रोल केले .हा सीन पाहिल्यानंतर संतप्तझालेल्या यूजर्सनी लिहिले की, ‘अक्षयचा हा चित्रपटही फ्लॉप होईल’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘गंगेत थुंकणे हे कॅनडाच्या अक्षय कुमारसाठी नवीन गोष्ट आहे’. याशिवाय अनेक यूजर्सनी या सीनसाठी अक्षय कुमारला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलेले आहे.

अक्षय कुमारचे चाहते मदतीला आले

अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ चित्रपटाच्या टीझर व्हिडिओचा हा सीन पाहिल्यानंतर एकीकडे अक्षय कुमारला टीका करत आहेत , तर दुसरीकडे चाहते अभिनेत्याचा बचाव करताना दिसत आहेत. अभिनेता अक्षय च्या तोंडामध्ये पाणी गेल्याने तो पाणी बाहेर टाकत आहे असे त्यांचे चाहते म्हणत आहेत .

अक्षय कुमार
अक्षय कुमार हा हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहे,अक्षय कुमार हा चित्रपट व्यवसायात सर्वाधिक कमाई करणारा कलाकार म्हणून ओळखला जातो.  सुर्यवंशी या चित्रपटासाठी अक्षय कुमार ने  (रु. 50 ते 100 कोटी दरम्यान) मोठी रक्कम आकारली आहे . पण OMG 2 मध्ये  फक्त 35 कोटी रुपये घेतले आहेत असे अनेक रिपोर्ट नुसार हे माहिती झाले आहे .

OMG 2 मध्ये  पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांची फी रिपोर्ट  नुसार , पंकज त्रिपाठी यांनी 5 कोटी rupay घेतले आहेत ,तर यामी गौतम ने 2 कोटी रुपये घेतले आहेत .

यामी गौतम
यामी गौतम ही एक भारतीय अभिनेत्री आहे , तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केलेली होती . चांद के पार चलो  आणि  ये प्यार ना होगा कम यांसारख्या टेलिव्हिजन सोप ऑपेरामध्ये तिने अभिनय केला  2012 मध्ये तिचा  विनोदी नाटक विकी डोनर मध्ये प्रदर्शित झाला ज्याने तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी झी सिने पुरस्कार जिंकला . 

यामी गौतम यांनी त्या नंतर  बदलापूर (2015) आणि कबिल (2017) हे चित्रपट केले तर  उरी: द सर्जिकल स्टाईक आणि बाला या चित्रपटात (2019) मध्ये  अभिनय केले व यामध्ये यश देखील मिळाले .आणि दासवी या चित्रपटामध्ये (2022) मध्ये काम केले आणि (2023) मध्ये चोर निकाल के भागा या स्ट्रीमिंग चित्रपटांमध्ये काम केले आहे

पंकज त्रिपाठी
पंकज त्रिपाठी हे एक भारतीय अभिनेता आहेत.  त्यांचे हिंदी , इंग्रजी,तेलगू आणि तमिळ या चित्रपटामध्ये दिसले आहेत .पंकज त्रिपाठी हे जास्त हिंदी चित्रपटात दिसले आहेत , त्यांना नॅशनल फिल्म  पुरस्कार ,फिल्मफेअर पुरस्कार आणि  IIFA पुरस्कार मिळाला आहे असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत . चित्रपटसृष्टीत पंकज त्रिपाठी हे खूप प्रसिद्ध अभिनेते आहेत .
त्रिपाठी यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा  मध्ये प्रवेश घेतला आणि ते 2004 मध्ये मुंबई मध्ये आले . त्रिपाठी यांनी  2004 साली रन या चित्रपटात अप्रमाणित भूमिका केल्या आणि रावण , अंग्निपथ  यासारख्या अनेक चित्रपटात  छोट्या भूमिका केल्या .

अनुराग कश्यप यांच्या  गँग ऑफ वासेपूर  मधील सुलतान च्या भूमिकेपासून त्रिपाठी प्रसिद्ध झाले ,त्रिपाठी यांच्या  आयुष्यातील  टर्निंग पॉइंट सुद्धा म्हणता येईल .याच्या नंतर त्यांनी  सिंघम रिटर्न , काला, एक्स्ट्रॅक्शन ,फुक्रे असे अनेक चित्रपट केले आहेत .
पंकज त्रिपाठी यांचे वेब सिरीज
मिर्झापूर , क्रिमिनल जस्टिक, युअर्स ट्रुली  आणि behind closed  doors  या वेब सिरीज मध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत .
पंकज त्रिपाठी हे एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रुपये चार्ज करतात . त्यांची एकूण संपत्ती 48 कोटी  पर्यंत आहे

Read more : अक्षय कुमार जीवनप्रवास

पहिला चित्रपट OMG (भाग 1)
OMG या चित्रपटाचे निर्माते उमेश शुक्ला हे होते ,OMG या चित्रपटामध्ये परेश रावल , अक्षय कुमार,मिथुन चक्रवर्ती ,गोविंद नामदेव,महेश मांजरेकर, ओम पुरी हे अभिनेते होते .या चित्रपटाने 2012 मध्ये धुमाकूळ घातला होता .
प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता ,OMG या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई 4.25 कोटी एवढी झाली होती ,दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाची कमाई 14.40 कोटी तर एका आठवड्याची कमाई 36.94 कोटी झाली होती . OMG ची एकूण कमाई 81.46 कोटी झाली होती .
OMG नंतर OMG 2 नवीन चित्रपटाची उत्सुकता अक्षय कुमार च्या चाहत्यांना लागली आहे , चित्रपटाची रिलीज डेट 11ऑगस्ट आहे .
पहिल्या OMG चा OMG 2 हा चित्रपट रेकॉर्ड तोडेल असे तुम्हाला वाटते का ? तुमचे मत तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करून सांगा .

Leave a Comment