Gautami Patil Biography In Marathi | गौतमी पाटील जीवनप्रवास

नमस्कार मित्रांनो , आजच्या नवीन आर्टिकल मध्ये तुमचं स्वागत आहे . आज आम्ही या आर्टिकल मध्ये सोशल मीडियावर प्रसिद्धअसणारी नृत्य कलाकार गौतमी पाटील याच्या जीवनप्रवासाबद्दल माहिती देणार आहोत .

कोण आहे गौतमी पाटील ? गौतमी पाटील नृत्य क्षेत्रात कशी आली ? या सर्व प्रश्नांची उत्तर या आर्टिकल मध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल .


चला तर गौतमी पाटील यांच्या जीवनप्रवासाबद्दल जाणून घेऊयात.

gautami patil
Gautami Patil Biography In Marathi

गौतमी पाटील हिचा जन्म ६ फेब्रुवारी १९९६ रोजी धुळे जिल्यातील सिंदखेड येथे झाला , लहानपणापासूनच तिच्या आईच्या वडिलांनी तिचे संगोपन केले गौतमीच्या वडिलांनी ती जन्मल्यापासून तिला व तिच्या आईला सोडून दिले होते .

गौतमीचे ८ वी पर्यंत चे शिक्षण हे गावी झाले त्या नंतर गौतमी चे कुटुंब पुण्यात सेटल झाले .

पुण्यात सेटल झाल्यानंतर गौतमीच्या वडिलांना परत आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे तिच्या आईला मारहाण करणे हे सुरु राहिले त्यामुळे त्यांना परत दूर ठेवावे लागले असे तिने सांगितले .

गौतमीने तिच्या वडिलांना ८ वी मध्ये असताना पाहिलांदा पहिले असे तिने सांगितले .

गौतमी पाटील चे करिअर

गौतमी ची आई हि बिसलरी बॉटल च्या कारखान्यात काम करत असे , पण एका अपघातामुळे गौतमीच्या आईला ते काम सोडावे लागले आणि सगळी जबाबदारी हि गौतमी वर आली . गौतमीचे शिक्षण देखील बंद झाले .

लहानपणापासूनच गौतमी ला डान्स ची खूप आवड होती . तिने विश्वकला डान्स अकेडमी मध्ये प्रवेश घेतला होता .


गौतमीला चांगला डान्स येत असल्याने तिने लावणी नृत्य मध्ये काम करणे सुरु केले त्यानंतर तिने पाहिलांदा बॅक डान्सर म्हणून काम केले


नवीन नवीन लावणी नृत्य या क्षेत्रात असल्याने तिला एवढ्या मोठा स्टेज वर लावणी करत असताना भीती देखील वाटत होती असे तिने सांगितले भीती मुळे तिच्या काही स्टेप देखील चुकल्या असे तिने सांगितले . गौतमीचे पहिले मानधन हे ५०० रुपये एवढे होते .


सुरवातीच्या काळात गौतमीच्या आईला सुद्धा माहीत नव्हते कि गौतमी हि लावणी नृत्य करत होती . गौतमीने घरी सांगितले होते कि ती फक्त इव्हेंट मध्ये काम करत आहे .

तिच्या घरी माहित झाल्यावर तिच्या घरच्यांचा खूप विरोध होता पण घरची परिस्थिती खराब असल्या कारणाने तिने हे काम सोडले नाही . आणि तिने हे काम तसेच पुढे चालू ठेवले .


लावणी सोडल्या नंतर गौतमीने फक्त डीजे शो चालू केले , गौतमीला खूप लोकांनी ट्रॉल केलं कि अश्या प्रकारची लावणी असते का म्हणून पण गौतमी ने स्पष्ट सांगितले कि मी कोणतीही लावणी करत नाही मी फक्त डीजे शो करते .

डीजे शो मध्ये आणि लावणी मध्ये खूप फरक आहे असे गौतमी ने सांगितले आहे .

महाराष्ट्रामध्ये गौतमीचे अनेक शो होत असतात . गौतमीच्या शो मध्ये हजारो चाहत्यांची गर्दी जमा होते . गौतमीच्या एका शो मधील विडिओ मध्ये गौतमीने अश्लील कृत्य दिसून आले तेव्हा गौतमीला खूप जणांनी ट्रोल केले

. नंतर गौतमीने तिची चूक कबूल केली आणि गौतमीने सर्वांची माफि देखील मागितलीकि अशी चूक पुन्हा होणार नाही म्हणून . तरीही लोकांनी तिला खूप ट्रोल केले .

गौतमी पाटील वय { gautami patil age }

अख्या महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे कि गौतमीचे वय काय आहे ते तर गौतमीचे वय हे २५ वर्ष एवढे आहे

गौतमी पाटील चे लग्न झाले आहे का ? { gautami patil husban }

सर्वाना प्रश्न पडला आहे कि गौतमी च लग्न झालं आहे का ? तिचा नवरा कोण आहे ? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छतो कि गौतमीचे अजून लग्न झालेले नाही .


गौतमीने सांगितले आहे कि माझे अजून लग्न झाले नाही पण मी लग्न करनार आहे अजून माझ्या मनासारखा मुलगा मिळालेला नाही असे गौतमीने मुलाखतीत सांगितले आहे .

Leave a Comment

South Indian Actress Name | तुम्हाला साऊथ इंडियन अभिनेत्रीची नावे माहिती आहेत का ? Pooja Hedge hot pics
South Indian Actress Name | तुम्हाला साऊथ इंडियन अभिनेत्रीची नावे माहिती आहेत का ? Pooja Hedge hot pics